नुकताच महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? हा सोहळा पार पडला. मनोरंजन विश्वातील मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराचं यंदाचं स्वरुप काही वेगळं होतं. यंदाचा “महाराष्ट्राचा फेवरेट कोण?” हा लोकप्रिय सोहळा ‘सुवर्णदशक सोहळा’ म्हणून साजरा करण्यात आलाय. या सोहळयात गेल्या 10 वर्षातील दर्जेदार कलाकृतींचा गौरव केला गेला. नुकताच हा सोहळा रंगलाय. यावेळी रेड कार्पेटवर अनेक दिग्गज कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती.
काळ्या आणि सोनेरी रंगाच्या कपड्यांची थीम असल्याने यावेळी कलाकार रेड कार्पेटवर एकापेक्षा एक अशा लुक्समध्ये दिसले. यावेळी महेश मांजरेकर, अजय - अतुल, सचिन पिळगांवकर, रमेश देव, सुलोचना दीदी या दिग्गज कलाकारांसह अनेक कलाकार उपस्थित होते.
सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, पुष्कर जोग, आकाश ठोसर, ललित प्रभाकर, क्रांति रेडकर वानखेडे, वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, सुव्रत जोशी, अमेय वाघ, स्वप्निल जोशी यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. रेड कार्पेटवर या कलाकारांचे जबरदस्त लुक्स पाहायला मिळाले.
शिवाय मंचावर काही खास परफॉर्मन्स पाहायला मिळाले आहेत. तर अनेक कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. लवकरच हा सोहळा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.