By  
on  

पुन्हा एकदा एकत्र झळकणार सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग, केली चित्रपटाची घोषणा

निर्माते आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग पुन्हा एकदा त्याच्या तिसऱ्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहे. स्कॉटलँडमध्ये त्यांचा तिसरा चित्रपट 'व्हिक्टोरिया' साठी ही टीम एकत्र आलीय.  'ती आणि ती' , 'वेल डन बेबी' चित्रपटाच्या  यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट हा नवा चित्रपट घेऊन येत असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आलीय.

अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकतील. याआधी 'ती आणि ती', 'तमाशा लाईव्ह' चित्रपटांच्या निमित्ताने पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी एकत्र झळकले होते. याशिवाय हीरा सोहल ही अभिनेत्री देखील या चित्रपटातून पदार्पण करत आहे. जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांचं दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलय.

 

आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशल शाह हे सह निर्माते आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला असून लवकरच या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive