By  
on  

पाहा Photos : अंकिता लोखंडेच्या लग्नात 'पवित्र रिश्ता' मधील कलाकारांची हजेरी

अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. अंकिता आणि विकी हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अंकिता-विकीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मेहंदी, संगीत, हळदी, साखरपुडा हे सगळे कार्यक्रम धुमधड्याक्यात पार पडले. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्यात 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या कलाकारांचं रियुनियन पाहायला मिळालं. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि प्रिया मराठे यांनी देखील अंकिताच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. पवित्र रिश्ता या मालिकेत अर्चनाची भूमिका साकारणाऱ्या अंकिताच्या बहिणींच्या भूमिकेत प्रार्थना आणि प्रिया झळकल्या होत्या. तेव्हापासून त्यांची खास मैत्री आहे. तेव्हा आपल्या मैत्रिणीच्या लग्नात या कलाकारांनी खास हजेरी लावली.

शिवाय अंकिताचा खास मित्र महेश शेट्टीही यावेळी उपस्थित होता. त्याचीही 'पवित्र रिश्ता' मालिकेत महत्त्वाची भूमिका होती. सोशल मिडीयावर अंकिताच्या लग्नातील हे फोटो चर्चेत आले आहेत. शिवाय अंकिताच्या लग्नाचे विविध कार्यक्रम, त्याचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

याशिवाय अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावे देखील अंकिताच्या लग्नसोहळ्यातील विविध कार्यक्रमात हजर होत्या. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive