By  
on  

पाहा Photos : सोनाली कुलकर्णी लंडनमध्ये साजरा करतेय ख्रिसमस, पतिने दिलं हे सरप्राईज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास सुट्टीची मजा लुटतेय. नुकतीच सोनाली यासाठी लंडनला रवाना झाली आहे. लंडनच्या एयरपोर्टवर मात्र सोनालीला खास सरप्राईज मिळालय. 

सोनालीचा पति कुणालने एयरपोर्टवर हजेरी लावत सोनालीला सरप्राईज दिलय. यावेळी कुणाल सोनालीला घेण्यासाठी एयरपोर्टवर पोहोचला शिवाय तिच्यासाठी भेटवस्तू म्हणून खास फुलांचा गुच्छ घेतला. 

हे सरप्राईज पाहुन सोनालीला प्रचंड आनंद झालाय. म्हणून सोशल मिडीयावर सोनालीने खास पोस्ट करून हे सरप्राईज शेयर केलय. शिवाय ख्रिसमसच्या निमित्ताने हे खास सरप्राईज मिळाल्याने कुणाल हाच तिचा सँटा क्लॉज असल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हटलय. 

याचवर्षी सोनाली आणि कुणालने लगीनगाठ बांधली होती. सोशल मिडीयावर या कपलचे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive