By  
on  

यमला पगला दिवाना फिरसेचं नवं गाणं लिटील लिटील,अशा अदांजात दिसले देओल

‘यमला पगला दिवाना फिरसे’ हा देओल पिता पुत्रांचा धम्माल विनोदी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल या गॅंगच्या आगामी सिनेमाचं ‘लिटील लिटील’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

बॉलिवुडमधील सर्वात सुपरहीट पिता-पुत्रांची ही तिकडी ‘लिटील लिटील’ या गाण्यात बेधुंद नाचताना दिसून येत आहेत. ‘यमला पगला दिवाना’ या सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबतच या सिनेमात क्रिती खारबंदा या अभिनेत्रीला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

‘यमला पगला दिवाना 3’ मध्ये बॉबी देओल महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना पाहायला मिळेल. तसंच या तिघांच्या गॅंगसोबतच सलमान खान पाहुणा कलाकार म्हणून एका सीनमध्ये एन्ट्री करणार असल्याची माहिती मिळतेय.

https://youtu.be/AODjiG8MeSA

‘यमला पगला दिवाना 3’ हा संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन भागांप्रमाणेच बॉबी देओल आणि सनी देओल भाऊ म्हणूनच या सिनेमातही व्यक्तीरेखा साकारतील. क्रिती खारबांदा सिनेमाची नायिका आहे तर धर्मेंद्र यांची भूमिका प्रेक्षकांसाठी सरप्राईज असून या नवीन भागात ते वकिलाच्या भूमिकेत दिसतील.

प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी ‘यमला पगला दिवाना फिरसे’ हा सिनेमा 31 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive