By  
on  

पाहा Video : या अभिनेत्याने नव्या सिनेमासाठी केला असा हँडसम लुक

चित्रपट, मालिका, नाटक किंवा जाहिरातीसाठी कलाकार विविध लुक करताना दिसतात. त्यात भूमिकेसाठी कधी दाढी वाढवणं, वजन कमी करणं, टक्कल करणं या गोष्टीही केल्या जातात. अभिनेता भूषण प्रधानही त्याच्या भूमिकेसाठी विविध लुकमध्ये पाहायला मिळालाय. आगामी काळात एका चित्रपटातही तो वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. 

या लुकमध्ये फारसा बदल नसून भूषणने आगामी सिनेमासाठी त्याची दाढी, मिशी काढून टाकली आहे. गेले काही वर्षे भूषणचा क्लीन शेव लुक दिसला नव्हता. मात्र आगामी भूमिकेसाठी भूषण आता क्लिन शेव लुकमध्ये दिसणार आहे. या लुकचा व्हिडीओ भूषणने नुकताच सोशल मिडीयावर शेयर केलाय.

'गोंद्या आला रे' या सिरीजसाठी भूषणने त्याचे केस कापून टक्कल केलं होतं. तर विविध भूमिकांसाठी भूषण त्याच्या फिटनेसमध्येही बदल करताना दिसतो. मात्र सध्याच्या क्लिन शेव लुकमध्ये भूषण चार्मिंग आणि हँडसम दिसत असल्याच्या कमेंट्स त्याला चाहतींकडून मिळत आहेत. आता ही भूमिका कोणती आणि कोणत्या चित्रपटासाठी भूषणने हा लुक केलाय याची वाट पाहावी लागेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive