By  
on  

पाहा Photos : अभिज्ञा आणि मेहुलच्या लग्नाला पूर्ण झाले एक वर्ष, आठवणींमध्ये रमली अभिज्ञा

मागील वर्षी मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले. तर काहींनी त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्याचा खुलासा केला. यावर्षी अशा काही कपल्सच्या लग्नाची वर्षपूर्ती पाहायला मिळतेय. मागील वर्षी अभिनेत्री अभिज्ञा भावेने देखील बॉयफ्रेंड मेहुलसोबत संसासर थाटला होता. याच लग्नाला नुकतच एक वर्ष पूर्ण झालय.

6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांनी लग्न केलं होतं. याच लग्नाला वर्ष पूर्ण होतय. या निमित्ताने अभिज्ञाने लग्नाच्या काही खास आठवणी शेयर केल्या आहेत. अभिज्ञाने तिच्या लग्नाचे आणि मेहुलसोबतचे काही रोमँटिक फोटो शेयर केले आहेत.

माझ्या आयुष्याचा तो सुंदर दिवस पुन्हा एकदा जगतेय.. असं लिहून अभिज्ञाने ही खास पोस्ट शेयर केली आहे. मागील वर्षी अभिज्ञाच्या या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. शिवाय तिच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांचे फोटोही चर्चेत आले होते. 

मेहुल आणि अभिज्ञा काही वर्षांपासून डेट करत असून मेहुल हा व्यावसायिक आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive