या कारणासाठी एकत्र जमले बिग बॉस मराठी 3 चे स्पर्धक

By  
on  

नुकतच बिग बॉस मराठी सिझन 3 ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे प्रेक्षकांना बिग बॉस मराठीची आठवण येत आहेत. मात्र नुकतीच यंदाच्या सिझनमधील स्पर्धकांची झलक सोशल मिडीयावर पाहायला मिळाली आहे. सोशल मिडीयावर एक फोटो चर्चेत आला आहे. या फोटो बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम, जय दुधाणे आणि अक्षय वाघमारे एकत्र पाहायला मिळत आहेत. 

हे दृश्य मात्र कोणत्या सोहळ्याचं नसून एका क्रिकेट मॅचचे आहे. पुनीत बालन सेलिब्रिटी लीगसाठी जय दुधाणेने भाग घेतला होता. याच क्रिकेट मॅचसाठी अक्षय वाघमारे आणि विशाल निकमनेही हजेरी लावली होती त्यावेळी टिपलेला हा क्षण सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आला होता.

या क्रिकेट मॅचमध्ये उत्तम कामगिरी करून जय दुधाणेने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. पुण्यात रंगलेल्या या सामन्यात बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांची हजेरी लक्षवेधी ठरली.

Recommended

Loading...
Share