By  
on  

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मराठी कलाकार गैरहजर ? हेमांगी कवी म्हणते...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. भारतरत्न लतादीदींच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला. दादरमधील शिवाजी पार्क येथे नुकतच लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. देशाचे पंतप्रधान मोदींनी देखील दीदींच्या अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. मात्र यावेळी कुठेही मराठी कलाकार न दिसल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी कलाकारांना जाब विचारलाय. 

फेसबुकवरील एका पोस्टमध्ये "शिवाजी पार्कवर आज कलाकारांना प्रवेश बंदी होती का?" असं लिहीण्यात आलं होतं. ज्यावर अभिनेत्री हेमांगी कवीने कमेंट करुन सत्य परिस्थिती समोर आणलीय. लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी स्वत: हेमांगी आणि इतर काही मराठी कलाकारही उपस्थित होते. मात्र त्यांना गेटमधून जाऊ न दिल्याचं तिने एका पोस्टवर कमेंट करुन सांगितलय. मराठी कलाकारांवर केलेल्या या टिकेवर हेमांगीने उत्तर दिलय.

हेमांगी लिहीते की, "'सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिले नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप मी आणि अभिजीत केळकर चार वाजल्यापासून तिथे होतो. शेवटपर्यंत आम्हांला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हते. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकले जात होते, तिथे माझी काय गत! आम्ही तिथे कुणी सेलिब्रेटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो...अक्षरशः भांडून आम्ही शेवटचे दर्शन घेतले! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आले नसावे."

त्यामुळे तिथे पोहचुनही गेटमध्ये जाऊ दिलं नसल्याचं हेमांगीने या कमेंटमध्ये सांगितलय. शिवाय नंतर अखेर शेवटचे दर्शन मिळाल्याचं ती म्हणतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive