जान्हवीला ईशानची ही गोष्ट खुप खटकते

By  
on  

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांचा ‘धडक’ हा सिनेमा आता प्रदर्शित होत आहे. दोघांसाठीही या सिनेमाचं यश तितकंच महत्त्वाचं आहे. सिनेमाच्या प्रोमोशनसाठी दोघेही देशाच्या विविध भागात प्रवास करत आहेत.

परंतु सहकलाकार ईशानची एक गोष्ट जान्हवीला खुपच खटकते. याबाबतचा खुलासा नुकताच तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुला ईशानची कोणती गोष्ट आवडत नाही तेव्हा ती म्हणते, “ईशान मला नेहमीच जीमबद्दल बरंच ज्ञान देतो. मला जीममध्ये सर्वप्रकारच्या गोष्टी करायला आवडतात तरीसुध्दा तो मला सारख्या त्याबद्दलच सूचना देत राहतो, हे मला अजिबात आवडत नाही.”पण जान्हवीला त्याच्या इतर गोष्टी आवडतात. जान्हवीच्या मते ईशान खुप महत्त्वकांक्षी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून तो खुप चांगला आहे.

या मुलाखतीदरम्यान जान्हवीने ईशानसोबतच्या पहिल्या भेटीविषयीसुद्दा सांगितले. मी ईशानला सर्वप्रथम शाहिद कपूरचा सिनेमा ‘फटा पोस्टर निकला हीरो’च्या स्क्रिनींगवेळी पाहिलं. त्यानंतर आम्ही धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये भेटलो. तिथे दिग्दर्शक शशांक खेतान यांनी आम्हाला ‘धड़क’ सिनेमाविषयी चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं.

ईशानला अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत आहेत. परंतु अद्याप त्याने कोणत्याही सिनेमाची स्क्रिप्ट वाचलेली नाही. ब-याच लोकांना हे माहित नसेल की, ईशानचा पहिला सिनेमा ‘धड़क’नसून ‘बियॉन्ड द क्लाउड’ आहे. या सिनेमासाठी ईशानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यातसुध्दा आलं होतं.

 

 

Recommended

Share