पाहा ‘तुझी माझी यारी दोस्ती’!

By  
on  

मैत्रीच्या निरागस, निखळ नात्यावर असलेल्या ‘दोस्तीगिरी’ सिनेमाचे ‘तुझी माझी यारी दोस्ती’ हे गाणे रिलीज झाले आहे. फ्रेंडशीप डेच्यानिमित्ताने प्रदर्शित झालेल्या ह्या गाण्यात मैत्रीतला गोडवा, खोडसाळपणा दिसून येतो आहे.

‘तुझी माझी यारी दोस्ती’ चे संगीत दिग्दर्शन रोहन-रोहन ह्यांनी केले आहे आणि त्यांनीच गायिका प्राजक्ता शुक्रेसोबत हे गाणे गायले आहे. याबाबत रोहन-रोहन म्हणतात, “आम्हा दोघांची मैत्री आमच्या संगीताविषयीच्या आवडीमुळे झाली. त्यानंतर आम्ही एकत्र काम करू लागलो. त्यामुळे मैत्रीचं नातं आम्हा दोघांसाठी खुप स्पेशल आहे. आणि आमच्या भावनाच ह्या गाण्यातून व्यक्त झाल्या आहेत.”

https://youtu.be/gDjMnGlrSGk

अभिनेता संकेत पाठक सांगतो, “हे गाणं अक्षय, विजय, पुजा आमच्यासाठी खुप स्पेशल आहे. कारण या गाण्यानेच चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. या गाण्याच्या शुटिंग दरम्यान एकमेकांना अनोळखी असलेल्या आम्हा कलाकारांची एकमेकांशी घट्ट मैत्री झाली. या गाण्याच्या शुटिंगच्यावेळी आम्ही केलेली धमाल तर अविस्मरणीय आहे.”

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित ‘दोस्तीगिरी’ सिनेमाचे लेखन मनोज वाडकर यांनी केले आहे. रोहन-रोहन यांच्या संगीताने सजलेल्या या सिनेमात संकेत पाठक, पुजा मळेकर, विजय गिते, पुजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे, हे प्रमुख भूमिकेत झळकतील.

'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित ‘दोस्तीगिरी’ 24 ऑगस्ट 2018ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

Recommended

Loading...
Share