ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशींचे मालिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन

By  
on  

आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी लवकरच एका नव्या भूमिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन करत आहेत. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमे असा त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरु असतो. स्टार प्रवाहवर नव्याने सुरू होणा-या 'ललित २०५' या मालिकेत त्या प्रमुख भूमिकेत झळकत आहेत.

'ललित २०५' ही मालिका एकत्रित कुटुंबावर आधारित आहे. सुहास जोशी या कुटुंबप्रमुखाच्या म्हणजेच आजीच्या भूमिकेत दिसतील. या मालिकेतील इतर कलाकारांबद्दलचा उलगडा अद्याप झालेला नाही. या मालिकेबद्दल बोलताना सुहास जोशी म्हणाल्या, ''अग्निहोत्र' या मालिकेनंतर मी बऱ्याच वर्षांनी स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे. याचा मला फार आनंद होत आहे. ही एक कौटुंबिक मालिका असून या मालिकेत मी आजीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि ही आजी तुम्हाला तुमच्या आजीची आठवण नक्कीच करून देईल.”

सुहास जोशी यांच्या यापूर्वी ‘प्रपंच’, ‘कुंकू’,‘ऊन-पाऊस’ या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 'ललित 205' ही मालिका 6 ऑगस्टपासून रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल.

 

Recommended

Loading...
Share