बॉलिवूडचे बाजीराव- मस्तानी म्हणजेच रणवीर सिंह आणि दिपीका पदुकोण ही जोडी म्हणजे इंडस्ट्रीतले लव्ह बर्ड्स हे सर्वांनाच माहितीय. सध्या रणवीर आणि दिपीकाच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आले असल्याचे आपण जाणतोच. हे बॉलिवूडचं सर्वात आवडतं प्रेमीयुगूल नुकतंच फ्लोरिडा येथे सिक्रेट व्हेकेशन साजरे करताना दिसले. त्यांच्या या सिक्रेट हॉलिडेचा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका गर्दीच्या ठिकाणी दिपीका व रणवीर एकमेकांच्या हातात हात घालून मस्त हिंडत आहेत आणि सुट्टी एन्जॉय करत आहेत. यासोबतच दिपीकाची बहिण अनिशा पदुकोणसुध्दा फिरताना दिसतेय.
या बॉलिवूड लव्ह-बर्ड्सच्या प्रेमाच्या सुरू असलेल्या बातम्यांनुसार, हे दोघं यंदा वर्षाअखेरीस विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचे डेस्टिनेशन वेडींग स्विर्झंलॅँड किंवा इटली येथे होणार आहे. तसंच लग्नात दोघांच्या फक्त नातेवाईक आणि फार जवळच्या मित्रपरिवाराला निमंत्रित करण्यात येणार असून हा फारच खासगी सोहळा असेल. तसंच त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन दोन ठिकाणी होईल.बॉलिवूड आणि काही मित्रपरिवारासाठी मुंबईत तर बंगळूर येथे दिपीकाच्या कुटुंबियासाठी असेल.
[video width="640" height="800" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/08/deepikapadukone_slay_37567150_2090887661149976_4188050204786470298_n.mp4"][/video]
रणवीर सिंह सध्या ‘सिम्बा’ सिनेमाची शुटींग पूर्ण करण्याची तयारी करतोय. त्याने नुकतंच नवीन घर खरेदी केलं असून त्याच्या घराच्या सजावटीचं काम सुरु आहे. लग्नानंतर दिपीका आणि रणवीर येथेच राहणार असल्याची चर्चा आहे. दिपीकाकडे सध्या तरी कुठलेही प्रोजेक्ट नसल्याचे बोलले जात आहे.
दिपीका आणि रणवीर दोघेही एकमेकांना डेट करत असले तरी सार्वजनिकरित्या त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. त्यामुळेच बॉलिवूडसोबतच त्यांच्या चाहत्यांनासुध्दा त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता आहे.