By  
on  

महानायक अमिताभ यांचा आजच्या दिवशी झाला होता पुर्नजन्म

बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 या रोजी झाला असला तरी या महानायकाचा पुर्नजन्म आजच्या दिवशी म्हणजे 2 ऑगस्ट 1982  रोजी झाल्याचं ते मानतात. या अभिनयसम्राटाला ‘कुली’ सिनेमाच्या सेटवर चित्रिकरणादरम्यान अपघात झाला होता, यात त्यांना जबर दुखापत झाली होती. बंगळूरच्या रूग्णालयातून त्यांना प्रकृती गंभीर असल्याने मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

देशभरातील त्यांच्या चाहत्यांकडून अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना सुरू होत्या. अनेकांनी देव पाण्यात ठेऊन उपास-तापास आणि नवससुध्दा केले आणि आजच्याच दिवशी त्यांची प्रकृती सुधारली. म्हणूनच त्यांनी या जीवनादान मिळालेल्या दिवसाच्या आठवणींना एक ट्विट शेअर करत उजाळा दिला आहे.

https://twitter.com/SrBachchan/status/1024787330949894148

बिग बी म्हणतात, “ आजच्या दिवशी कुलीच्या सेटवर झालेल्या अपघातातून मी वाचलो. माझा एकप्रकारे 2 ऑगस्ट 1982 हा पुर्नजन्मच आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांचे प्रयत्न याशिवाय हे शक्य नव्हतं. सर्वांचे खुप खुप आभार.”

बंगळुरहून जेव्हा मुंबईला अमिताभ यांना रुग्णवाहिकेने आणण्यात आलं. त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर होती. तीन तासांच्या ऑपरेशननंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. अमिताभ यांना उपचारासोबतच सर्वांच्या प्रार्थनेमुळे या अपघातातून वाचण्यात प्रचंड मदत झाली हे, वेगळं सांगायला नको.

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive