By  
on  

पिपिंगमून मराठीचा दणक्यात शुभारंभ, सर्वत्र सुरुय वेबसाईटची चर्चा

बॉलिवूडमधील लोकप्रिय वेबसाईट पिपिंगमून याची मराठी आवृत्ती सुपरस्टार अक्षय कुमार आणि गीतकार-अभिनेते स्वानंद किरकिरे यांच्या हस्ते नुकतीच लॉंच झाली. पिपिंगमून मराठी वेबसाईटचा दणक्यात शुभारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वेबसाईटबद्दल सर्वच प्रसिध्दी माध्यमांत जबरदस्त चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून आले. अनेक वृत्तपत्र, वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वत्र पिपिंगमून मराठीचे स्वागत करण्यात आले.

पिपिंगमून ही बॉलिवूडची लोकप्रिय आणि सर्वात वेगवान अपडेट्स देणारी PeepingMoon.com ची मराठी वेबसाईट आहे. मराठी सिनेमा, टीव्ही, नाटक यांसोबतच गॉसिप, विविध पुरस्कार सोहळे, सिनेरिव्ह्यू व सिनेसृष्टीतील प्रत्येक अपडेट्स पिपिंगमून तुमच्यापर्यंत पोहचवते. 27 जुलैपासून https://marathi.peepingmoon.com  वाचकांच्या सेवेसाठी सज्ज आहे.

या लॉंचच्यावेळी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार म्हणाला, “मराठी सिनेमे मला फार आवडतात, त्यातील हटके विषय फार भावतात. आज विविध विषयांवर मराठी सिनेमे येत आहेत. त्यांच्यात नेहमीच एक विविधता जाणवते. हिंदी सिनेमात ज्या विषयांवर सिनेमे तयार करण्यात आले नाहीत, त्यावर मराठी सिनेमे बनले आहेत.  मराठी सिनेमांचे विषय फार चोखंदळ अससतात. मराठीत नेहमीच बोल्ड विषय हाताळले जातात. हिंदी सिनेमात तेवढं धाडस नाही. मला वाटतं हिंदी सिनेमांनी मराठीचं अनुकरण करायला हवं.” तसंच पिपींगमून मराठी प्रेक्षकांपर्यत पोहचण्यासाठी घेत असलेल्या अथक प्रयत्नांचे त्याने यावेळी प्रचंड कौतुक केले.

www.peepingmoon.com या वेबसाईटची सुरुवात सप्टेंबर 2017 मध्ये मार्क मॅन्युअल आणि निशांत अ. भुसे या मनोरंजन विश्वातील दोन दिग्गज जाणकारांनी केली. पहिल्याच वर्षात ‘ऑक्टोबर’, ‘परमाणू’, ‘सूरमा’ आणि आता ‘गोल्ड’ या सिनेमांसाठी पिपींगमून डिजीटल पार्टनर होते. आता पहिल्यांदाच एखादी बॉलिवूड वेबसाईट एक्सक्ल्यूझिव्हरित्या मराठी मनोरंजनासाठी आपले  व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive