By  
on  

रितेशचा शिवरायांना मानाचा मुजरा

बॉलिवूडमधील आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने मराठी सिनेसृष्टीत 'लय भारी' पदार्पण केलं. लवकरच त्याचा 'माऊली' हा सिनेमासुध्दा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एका महत्त्वकांक्षी प्रोजेक्टवर रितेश सध्या काम करत असल्याचे आपल्याला माहितच आहे. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमात रितेश महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

रितेश देशमुख महाराजांचे अनेक फोटो नेहमी आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरुन शेअर करत असतो. कधी महाराजांच्या गड किल्ल्यावरील फोटो ट्विट करत तो नेहमीच महाराजांविषयी माहिती देत राहतो. नुकताच त्याने रायगड किल्ल्यावरील महाराजांचा एक अप्रतिम फोटो शेअर करत त्याला ‘जय शिवराय’, असं कॅप्शन दिलं आहे.

https://instagram.com/p/Bl7BGsSAjv1/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control

हा सिनेमा आतापर्यंतचा बिग बजेट सिनेमा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. महाराजांच्या आयुष्यावर तयार करण्यात येणाऱ्या या सिनेमात विविध कलाकारांची फौज आणि अॅक्शन बघायला मिळणार आहे, असे रितेशने सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्याची मुंबई फिल्म कंपनीच या सिनेमाची निर्मिती करत आहे.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतक्या मोठ्या प्रमाणावर उलगडणार असल्याने सर्वांनाच रितेशच्या या महत्त्वकांक्षी सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive