अभिनेता इरफान खान पाठोपाठच अभिनेत्री सोनाली बेंद्रेलासुध्दा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ट्विटरवरुन सोनालीसुध्दा आपल्या आजाराची माहिती देते. मागील काही दिवसांपासून सोनाली न्यूयॉर्क येथे उपचार घेत आहे. सोनालीचे पती गोल्डी बहलसुध्दा तिच्यासोबत तिची काळजी घेण्यासाठी न्यूयॉर्क येथे आहेत. गोल्डी यांनी नुकतीच सोनालीच्या आरोग्याविषयी नवीन माहिती ट्विटरवरुन शेअर केली आहे. ते म्हणाले, “सोनालीची तब्येत सध्या स्थिर आहे. तसंच ती उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देते आहे. हा मोठा प्रवास असून ही आमची या लढाईची फक्त सुरूवात आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि पाठबळासाठी धन्यवाद.”
https://twitter.com/GOLDIEBEHL/status/1025055985461805056
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेद्रेंने आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची बातमी 4 जुलै, 2018 रोजी दिली होती. सोनाली सध्या मोठ्य धैर्याने कॅन्सरशी झुंज देत असून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. पण ही बातमी आपल्या मुलाला कशी सांगायची याची चिंता सोनालीला सारखी सतावत होती. सोनाली आणि पती गोल्डी बहल यांच्यासमोर आपला मुलगा रणवीरला हे कसं सांगायचं, आणि तो यावर कशी प्रतिक्रिया देईल हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण दोघंही आई -बाबांनी मोठ्या धीराने ही परिस्थिती सावरुन घेतली.
https://twitter.com/iamsonalibendre/status/1014400756223479808
सोनाली याआधी टीव्ही शो ‘इंडीयाज बेस्ट ड्रामेबाज’ कार्यक्रमाच्या परीक्षकपदाची धुरा सांभाळत होती. आता सोनालीच्या आजारपणामुळे अभिनेत्री हुमा कुरेशी ही जबाबदारी सांभाळते आहे. 1994 मध्ये सोनाली बेंद्रेने ‘आग’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
सोनालीच्या धैर्याला बॉलिवूडसोबतच तमाम चाहत्यांचा त्रिवार सलाम. ती लवकरच या कठीण प्रसंगून बाहेर पडेल.