By  
on  

‘बच्चन’ मराठीत येत आहेत

मराठी सिनेमांमध्ये सध्या अनेक नवनवीन विषयांवर सिनेमे तयार होत आहेत. त्यांची कथा आणि सादरीकरणसुध्दा तितकंच रंजक असतं. असाच एक हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूड बादशाह अमिताभ बच्चन मराठी सिनेमांमध्ये सध्यातरी झळकणार नाहीत, तर ‘बच्चन’ असं नाव असेलला आगामी मराठी सिनेमा आहे आणि एक कुतूहल निर्माण करणारी टॅगलाईनसुध्दा त्याच्या फर्स्ट पोस्टरवर देण्यात आली आहे.‘बच्चन’ म्हणजेच अश्रु, श्वेत, रक्त!, असं लिहीलं आहे. बंदुक असलेल्या पार्श्वभूमीवर गिरण्यांचे चित्र पोस्टरवर रेखाटण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/BmAaIXflNEB/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control

‘आयना का बायना’ आणि ‘हाफ तिकीट’ सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन करणारे समित कक्कड हेच ‘बच्चन’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत असून या सिनेमाची माहिती त्यांनी आपल्या सोशल अकाउंटवरुन दिली. ‘आमच्या सिनेमाचं पहिलं टिझर पोस्टर’, असं त्यांनी त्याला कॅप्शन दिलं आहे. अमेय खोपकर एन्टरटेन्मेंट आणि पर्पल ब्ल्यू एन्टरटेन्मेंट निर्मित या सिनेमाचे लेखन समित कक्कड आणि ऋषिकेश कोळी यांनी केले आहे.

‘बच्चन’ या शिर्षकावरून सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. सिनेमाच्या चित्रिकरणालासुध्दा लवकरच सुरुवात होणार आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर हा मराठी सिनेमा बेतला आहे, की काय अशा चर्चासुध्दा सर्वत्र रंगल्या आहेत. यातील कलाकार अद्यापही गुलदस्त्यात असून ‘बच्चन’ पुढील वर्षी 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive