‘देवदास’ सिनेमात ‘पारो’ आणि ‘चंद्रमुखी’ म्हणून बॉलिवूडच्या दोन सौंदर्यवतींनी सर्वांनाच भुरळ पाडली. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व माधुरी दिक्षीत नेने यांच्या अभिनयाने हा सिनेमा सजला. महत्त्वाचं म्हणजे आता ब-याच वर्षानंतर या दोन सौंदर्यवतींना एकत्र पाहण्याचा दुग्धशर्करा योग नुकताच आला.
ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फन्ने खान’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी एक स्पेशल स्क्रिनींग खास बी- टाऊनच्या पाहुण्यांसाठी ठेवण्यात आले होते. अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते, पण हे स्क्रिनींग तेव्हा खुपच खास ठरले जेव्हा माधुरीची एन्ट्री झाली.
माधुरी आणि ऐश्वर्या आपापल्या शेड्यूल्डमध्ये बिझी असल्याने ब-याच दिवसांनी एकत्र भेटल्या. त्यांनी एकमेकींना आलिंगन देत आपल्या या भेटीचा मनोसोक्त आनंद व्यक्त केला. एकमेकींना भेटून त्या फारच खुश दिसत होत्या. अनिल कपूरसुध्दा यावेळी माधुरीच्या स्वागतासाठी हजर होते. उपस्थित सर्वच कलाकारांनी या दोघींना पाहून पारो आणि चंद्रमुखीला एकत्र पाहिल्यानिमित्त समाधान व्यक्त केले. पण उपस्थितांनी देवदास म्हणजेच किंग खान शाहरुखलासुध्दा यावेळी प्रचंड मिस केले असणार. सर्वांनाच या तिघांची जादू पुन्हा अनुभवण्याची नक्कीच आतुरता आहे.
महत्त्वाचं म्हणजे, ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चनसुध्दा या स्क्रिनींगला आईसोबत हजर होती. म्हणूनच यावेळी तिची आणि माधुरीची विशेष भेट झाली. यावेळी अनेक बॉलिवूडकर उपस्थित होते. बोनी कपूर, शबाना आझमी, अभिषेक बच्चन, मल्लिका शेरावत, रवीना टंडन, राकेश ओमप्रकाश मेहरा, उर्वशी रौतेला यांचा सहभाग होता.