By  
on  

पाहा, अंकिता लोखंडेचा बोल्ड अंदाज

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे सर्वांनाच माहिती आहे. या मालिकेतील सुशांत-सिंग राजपूत आणि तिची ऑन-स्क्रिन केमिस्ट्रीसुध्दा प्रेक्षकांना प्रचंड भावली. ख-या आयुष्यातसुध्दा दोघंही बरेच दिवस रिलेशनशीपमध्ये होते. पण एक वर्षांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. मध्यंतरी अकिंता कुठेच झळकल्याचे दिसत नव्हती पण नुकताच तिने स्वत:चं बोल्ड फोटोशूट करुन घेतलं आहे. तिने बोल्ड अंदाजातील हे फोटो आपल्या सोशल अकाउंटवरुन शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/Bl-EaMPF1lC/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control

मध्यतंरी अंकिता छोट्या पडद्यावरुन पण गायब होती. सर्वच जण तिच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रतिक्षेत होते,पण आता ती थेट सिल्व्हर स्क्रिनवर झळकणार आहे. ‘मणिकर्णिका’ या सिनेमाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या सिनेमात ती झलकारी बाई या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/Bl-EDFGFNYD/?taken-by=lokhandeankita

झलकारी बाई ही वीरांगना होती. तसेच ती राणी लक्ष्मीबाईंच्या जवळची होती. दोघींच्या चेह-यातील साम्यामुळे त्या वेष पालटून दुश्मनांना सळो की पळो करुन सोडायच्या. या ऐतिहासिकपटात अंकिताला पाहणं एकप्रकारे उत्कंठावर्धक असणार आहे, साहजिकच सर्वांना अंकिताच्या या पहिल्या बॉलिवूड सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive