By  
on  

धीट सोनालीने शेअर केला फोटो, या रुपातही दिसतेय सुंदर

बॉलिवूडची एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सोनाली बेंद्रे हिला हायग्रेड कॅन्सर असल्याचे आपण सर्वच जाणतो. या बातमीने बॉलिवूडसह तिचा संपूर्ण चाहता वर्ग हळहळला. परंतु सोनाली मात्र या कठिण प्रसंगाला धैर्याने सामोरी जाताना पाहायला मिळते आहे.

मागील काही दिवसांपासून सोनाली न्यूयॉर्क येथे उपचार घेते. तिचे पती गोल्डी बहलसुध्दा तिच्यासोबत असून ते तिची भरपूर काळजी घेत आहेत. गोल्डी यांनी नुकतीच सोनालीच्या आरोग्याविषयी नवीन माहिती ट्विटरवरुन शेअर केली. ते म्हणाले, “सोनालीची तब्येत सध्या स्थिर आहे. तसंच ती उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देते आहे. हा मोठा प्रवास असून ही आमची या लढाईची फक्त सुरूवात आहे.”

नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असणा-या सोनालीने फ्रेंडशीपडेच्या निमित्ताने नुकताच आणखी एक नवीन फोटो शेयर केला आहे. यात सोनालीने तिचे संपूर्ण केस कापून टाकल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसंच तिच्यासोबत स्वदेस फेम अभिनेत्री गायत्री जोशी आणि ऋतिक रोशनची पत्नी सुझान खान दिसत आहे आणि हा क्षण खुद्द ऋतिकनेच आपल्या कॅमे-यात कैद केला आहे.

सोनालीने या फोटोसह एक कॅप्शन दिले आहे, “ माझ्या ब-या-वाईट प्रसंगात नेहमीच खंबीर साथ देणा-या माझ्या मित्र-मैत्रिणींना खुप खुप धन्यवाद. आजारपणामुळे खुप त्रास सहन करावा लागत असला तरी. प्रिय दोस्तांमुळे तो चटकन नाहीसा होतो.” सोनाली पुढे म्हणते, “ आता मला तयार व्हायला वेळ लागत नाही. कारण,मला आता केसांची स्टाईलच करावी लागत नाही.”

https://twitter.com/iamsonalibendre/status/1025978051459526656

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेद्रेंने आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची बातमी 4 जुलै, 2018 रोजी  दिली होती. सोनाली सध्या मोठ्य धैर्याने कॅन्सरशी झुंज देत असून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. पण ही बातमी आपल्या मुलाला कशी सांगायची याची चिंता सोनालीला सारखी सतावत होती. सोनाली आणि पती गोल्डी बहल यांच्यासमोर आपला मुलगा रणवीरला हे कसं सांगायचं, आणि तो यावर कशी प्रतिक्रिया देईल हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण दोघंही आई -बाबांनी मोठ्या धीराने ही परिस्थिती सावरुन घेतली.

सोनाली याआधी टीव्ही शो ‘इंडीयाज बेस्ट ड्रामेबाज’ कार्यक्रमाच्या परीक्षकपदाची धुरा सांभाळत होती. आता सोनालीच्या आजारपणामुळे अभिनेत्री हुमा कुरेशी ही जबाबदारी सांभाळते आहे.1994 मध्ये सोनाली बेंद्रेने ‘आग’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सोनालीच्या या धैर्याला बॉलिवूडसोबतच तमाम चाहत्यांचा त्रिवार सलाम. ती लवकरच या कठीण प्रसंगून बाहेर पडेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive