By  
on  

देसी गर्लचा आणखी एका सिनेमाला रामराम; भन्साळींच्या सिनेमाला दिला नकार

देसी गर्ल प्रियंका चोप्रा हॉलिवूडवासी झाल्यापासून अनेक बॉलिवूड सिनेमांना रामराम ठोकत आहे. बॉयफ्रेंड निक जोनसमुळे प्रियंका सतत चर्चेत असते. अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि सलमान खान स्टारर ‘भारत’ सोडल्यानंतर तिने आता आणखी एका सिनेमाला रामराम केले आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रियंका आता बॉलिवूडमधील मोठ्या प्रोजक्टलासुध्दा गुडबाय म्हणतेय.

डीएनएच्या वृत्तानुसार, प्रियंका आणि तिचे आवडते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे एका गॅंगस्टरच्या आयुष्यावर आधारीत गंगूबाई कोठेवाली या सिनेमानिमित्त एकत्र येणार असल्याचे एक वर्षापूर्वी समजले होते. पण प्रियंकाने ‘भारत’ नंतर हा सिनेमासुध्दा सोडला आहे. अगदी शेवटच्या क्षणीच तिने या सिनेमाला आपला नकार कळवल्याचे वृत्त आहे. हॉलिवूड सिनेमा ‘काउबॉय निन्जा वाइकिंग’साठी तिने भन्साळींना नाही म्हटल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर प्रियंकाने या सिनेमाला नकार कळवल्याने भन्साळींनीसुध्दा या सिनेमाचा विषय पुन्हा गाठोड्यात बांधून ठेवल्याचे समजते. प्रियंका नाही तर सिनेमापण नाही, अशी काहीशी त्यांची अवस्था झाली आहे.

‘काउबॉय निन्जा वाइकिंग’ या हॉलिवूडपटात प्रियंका क्रिस प्रैटच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांची जबरदस्त केमिस्ट्री सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा हॉलिवूडचा एक बिग बजेट सिनेमा आहे.  तसंच ‘इजन्ट इट रोमॅंटिक’या रोमॅंटिक सिनेमातसुध्दा ती रेबेल विल्सनसोबत दिसेल.

सोनाली बोसच्या ‘द स्काई इज पिंक’  या बॉलिवुडपटात फरहान अख्तरसोबत प्रियंका झळकणार आहे. हा प्रोजेक्ट सध्यातरी ती करतेय, आता पाहू देसी गर्ल बॉलिवूड सिनेमांना किती प्राधान्य देते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive