By  
on  

‘बच्चन’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकतोय हा अभिनेता?

मराठी सिनेमांमध्ये सध्या अनेक नवनवीन विषयांवर सिनेमे तयार होत आहेत. त्यांची कथा आणि सादरीकरणसुध्दा तितकंच रंजक असतं. असाच एक हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे या सिनेमात मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा एक अभिनेता प्रमुख भूमिकेत झळकत असल्याची माहिती मिळते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सिनेसृष्टीतील टॉल, डार्क आणि हॅण्डसम अभिनेता वैभव तत्ववादी ही प्रमुख भूमिका साकारतो आहे. अद्यापतरी या वृत्ताला दुजोरी मिळालेला नाही. यापूर्वी अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबत वैभव ‘व्हॉट्सअप लग्न’ या सिनेमात झळकला होता. जर वैभवमध्ये भूमिकेत असेल तर त्याची अभिनेत्री कोण हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

‘बच्चन’ असं हा नाव असेलला आगामी मराठी सिनेमा आहे आणि एक कुतूहल निर्माण करणारी टॅगलाईनसुध्दा त्याच्या फर्स्ट पोस्टरवर देण्यात आली आहे.‘बच्चन’ म्हणजेच अश्रु, श्वेत, रक्त!, असं लिहीलं आहे. बंदुक असलेल्या पार्श्वभूमीवर गिरण्यांचे चित्र पोस्टरवर रेखाटण्यात आले आहे.

‘आयना का बायना’ आणि ‘हाफ तिकीट’ सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन करणारे समित कक्कड हेच ‘बच्चन’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत असून या सिनेमाची माहिती त्यांनी आपल्या सोशल अकाउंटवरुन दिली. ‘आमच्या सिनेमाचं पहिलं टिझर पोस्टर’, असं त्यांनी त्याला कॅप्शन दिलं आहे. अमेय खोपकर एन्टरटेन्मेंट आणि पर्पल ब्ल्यू एन्टरटेन्मेंट निर्मित या सिनेमाचे लेखन समित कक्कड आणि ऋषिकेश कोळी यांनी केले आहे.

‘बच्चन’ या शिर्षकावरून सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर हा मराठी सिनेमा बेतला आहे, की काय अशा चर्चासुध्दा सर्वत्र रंगल्या आहेत. ‘बच्चन’ पुढील वर्षी 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive