By  
on  

प्रिती म्हणतेय,‘भैयाजी सुपरहिट’

सनी देओल आणि प्रिती झिंटा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भैयाजी सुपरहिट’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं एक नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.पोस्टरवर भारतीय साडी परिधान करून साजश्रृंगार केलेली प्रिती हातात बंदुक घेऊन उभी आहे.पोस्टरवरुन प्रितीच्या या सिनेमातील दबंग व्यक्तिरेखेचा अंदाज बांधता येतोय.

‘भैयाजी सुपरहिट’मध्ये प्रिती आणि सनी यांच्यासह अमिषा पटेल, अर्शद वारसी आणि श्रेयस तळपदे हे महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांमध्ये झळकत आहेत. या सिनेमाद्वारे प्रिती जवळपास चार वर्षानंतर सिनेमांमध्ये पुनरागमन करते आहे. तर अमिषा ‘गदर’च्या तब्बल बारा वर्षानंतर सनी देओलसह एकत्र दिसणार आहे.

‘भैयाजी सुपरहिट’ हा सिनेमा उत्तर प्रदेशमधील माफियांच्या पार्श्वभूमीवर बेतला असून प्रिती झिंटाला सनी देओलच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसंच एका इंटरव्ह्यू दरम्यान सनी देओलने आपण या सिनेमात डबल रोलमध्ये असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे सर्वांनाच सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive