By  
on  

अजयची तमिळ एन्ट्री;कमल हसनबरोबर करणार स्क्रिन शेअर?

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि अॅक्शनची जादू दाखवल्यानंतर आता अजय देवगण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार असल्याची बातमी आहे. सिनेसृष्टीतील हे दोन मोठे कलाकार, सुपरस्टार कमल हसन आणि अजय देवगण हे दोघं लवकरच स्क्रिन शेअर करताना पाहायल मिळतील.

सूत्रांच्या माहितीनुसार कमल हसन 1996 चा ब्लॉकब्लस्टर सिनेमा इंडियनच्या सिक्वेलची तयारी करत आहेत. ‘इंडियन’मध्ये कमल हसन आणि मनिषा कोईराला प्रमुख भूमिकेत होते. सिक्वेलमध्ये अजय देवगण खलनायक साकारणार असल्याची माहिती आहे. कमल हसनसह या सिनेमात अजय भूमिका साकारणार असल्याच्या वृत्ताला अद्याप तरी दुजोरा मिळालेला नाही. याबाबत कमल हसन यांना विचारले असता, एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले, “अजय या सिनेमात आहे, असं मला सांगितलं गेलं आहे, तसंही संपूर्णपणे सर्व काही दिग्दर्शकावर अवलंबून आहे, की त्यांनी कोणाला साईन करावं.”

‘इंडियन 2’ हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगूमध्येसुध्दा प्रदर्शित करण्यात येणार आहे. रजनीकांत यांच्या आगामी ‘२.०’ या सिनेमाचं दिग्दर्शन करणारे शंकर हे या सिक्वेलच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

कमल हसन म्हणतात, “ ‘विश्वरुप 2’ हा राजकारण आणि हेरगिरीवर आधारित थ्रीलर सिनेमा आहे. ही हटके कथा सिनेमातून प्रेक्षकांपर्यत नक्कीच पोहचायला हवी.” ‘विश्वरूपम 2’ हा कमल हसन याचा 2013 मध्ये आलेला सिनेमा ‘विश्वरूपम’चा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होत आहे. यात शेखर कपूर, वहिदा रेहमान, राहुल बोस, पूजा कुमार, एंड्रिया जेरेमियाह, जयदीप अहलावत, नसीर, अनंत महादेवन, युसूफ हुसैन, राजेंद्र गुप्ता आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाविषयी कमल हसन यांना प्रचंड आत्मविश्वास आहे.

आता महत्त्वाचं म्हणजे अजय देवगण याचा ‘इंडियन 2’ मधील अभिनय दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काय कमाल करतो, हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive