By  
on  

अक्षय कुमारसाठी ‘गोल्ड’न क्षण, बनला सर्वाधिक लोकप्रिय!

यंदा फेब्रुवारी माहिन्यात प्रदर्शित झालेल्या आपल्या पॅडमॅन सिनेमामुळे अक्षय कुमार स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता  बनला होता. त्यानंतर सहा महिन्यात बहुतेक आठवड्याच्या अखेरीस सलमान खानच नंबरवन स्थानी असल्याचं दिसून येतं होतं. मात्र आता सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा खिलाडी कुमारने बाजी मारली आहे.

आपल्या ‘गोल्ड’ सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे अक्षय कुमार पुन्हा एकदा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या  मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या माहितीनुसार, अक्षयकुमार 81 गुणांसह सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. तर दबंग खान 69 गुणांसह दुस-या स्थानी आणि अमिताभ बच्चन 67 गुणांसह तिस-या स्थानावर आहेत. किंग खान 37 गुणांसह चौथ्या स्थानी तर संजय दत्त 32 गुणांसह पांचव्या स्थानी आहे.

[video width="640" height="800" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/08/akshaykumar_37972699_214482395861062_1190399165326388673_n.mp4"][/video]

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात,,“जेव्हा जेव्हा अक्षयकुमारचा सिनेमा येतो, तेव्हा लोकप्रियतेमध्ये कोणी त्याला मागे टाकू शकत नाही, हे या गोष्टीने सिध्द झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा अक्षयकुमारचा पॅडमॅन सिनेमा आला होता तेव्हा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात सर्वत्र खिलाडी कुमारच दिसत होता. आता सुध्दा जेव्हा गोल्ड प्रदर्शित होत आहे. सहा महिन्यांपासून जवळ जवळ प्रत्येक आठवड्यामध्ये नंबर वन असलेल्या सलमान खानला त्याने मागे टाकले आहे.”

अश्वनी कौल पूढे म्हणतात, “गेल्या महिन्यात अक्षयकुमार प्रस्तुत मराठी सिनेमा चुंबक प्रदर्शित झाला. तेव्हा मराठी माध्यमंच नाही तर हिंदी माध्यमांमध्येही अक्षयच्या या मराठी सिनेमाची चर्चा होती आणि ‘गोल्ड’ सिनेमामुळे तर अक्षय फेसबुक, ट्विटर, व्हायरल न्यूज़, वृत्तपत्र आणि डिजिटल साईट्स या सर्वच ठिकाणी लोकप्रिय आहे.”

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive