मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी आणि सुंदर अभिनेत्री अशी ओळख असणारी प्रिया बापट नेहमीच हटके फॅशन आणि लूक्समुळे चर्चेत असते. तिचे विविध लूक्स ती सोशल मिडीयावरुन नेहमी शेअर करते. फॅशनेबल राहण्यास ती पसंती देते. नुकतंच तिने आपल्या अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत म्हटलं, “मी कधीच साडीची फॅन नव्हती पण सध्या मी साडी नेसण्यालाच प्रथम प्राधान्य देते. हा पेहराव मला आता आवडू लागला आहे. “
प्रियाचे साडीतील विविध लुक्स खास मराठी पिपिंगमूनवर पाहा,
सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरूरकरने प्रियाचा हा अप्रतिम लूक आपल्या कॅमे-यात केला आहे. या कॉटनच्या साध्या साडीत ती खुलून दिसतेय.
लाईट शेड्च्या या फॅशनेबल साडीत प्रिया सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
पारंपारिक भारतीय साडी आणि दागिन्यांचा साज-श्रृगांर परिधान केल्याने प्रियाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.