करण जोहरने केली ‘तख्त’ची घोषणा, सिनेमात दिसेल तगडी स्टारकास्ट

By  
on  

बॉलिवूडचा प्रसिध्द निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याने नुकतीच ‘तख्त’ या बिग बजेट सिनेमाची घोषणा केली आहे. हा ऐतिहासिक सिनेमा असून यात मुघलांचा काळ पाहायला मिळणार आहे. तसंच या बिग बजेट सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखांमध्ये तगडी स्टारकास्ट आहे वेगळं सांगायला नको. हा सिनेमा करण्याचा ब-याच वर्षांपूर्वीपासूनचा करण जोहरचा मानस होता, असे बोलले जात आहे.

करण जोहरने खुद्द ‘तख्त’ सिनेमाची घोषणा आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केली. सिनेमात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर अशी कलाकारांची भलीमोठी फौज आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. करण म्हणतो, “ही इतिहासातील एक अविश्वसनीय कथा आहे. मुघल सिंहासनाच्या लढाईची....एका परिवाराची महत्त्वकांक्षा, इर्षा, विश्वासघात आणि प्रेम यांची ही कहाणी आहे. करणने पुढे लिहलं आहे, TAKHT is about WAR for LOVE , यावरुन असंच स्पष्ट होतंय की हे युध्द सिंहासनाच्या प्रेमापोटी होणार आहे.

https://twitter.com/karanjohar/status/1027366318893281280

सूत्रांच्या माहितीनुसार, औरंगजेबचा काळ सिनेमात अवतरणार आहे. ‘पद्मावत’मधील अल्लउद्दिन खिलजी हा खलनायक साकारणारा अभिनेता रणवीर सिंह या सिनेमातसुध्दा औरंगजेबच्या निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’सारख्या सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा रणवीर करणसह प्रथमच ‘तख्त’द्वारे एकत्र काम करतोय, त्यामुळे दोघांचं ट्य़ुनिंग कसं जुळणार आह ,पाहणंसुध्दा औत्सुक्याचं ठरणार आहे. रणवीरनंतर करिनाचा क्रमांक आहे, तो म्हणजे दुस-या प्रमुख भूमिकेसाठी. त्यानंतर आलिया भट् आणि जान्हवी कपूर यांच्या व्यक्तिरेखा असतील. महत्त्वाचं म्हणजे जान्हवी आपले काका अनिल कपूर यांच्यासोबत ती प्रथमच झळकतेय.

सर्व बॉलिवूडकरांना आणि तमाम प्रेक्षकांना करणच्या या ऐतिहासिकपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. 2020 मध्ये ‘तख्त’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share