By  
on  

'दिल दोस्ती दुनियादारी'च्या निशाची ‘पार्टी’

'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेतील 'निशा' आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच अभिनेत्री मंजिरी पुपाला लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेला युवा वर्गाने अक्षरश: डोक्यावर घेतले मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' सिनेमात मंजिरी ही 'दिपाली' या एका बिनधास्त मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'पार्टी' या सिनेमात तिच्यासोबत 'दिल दोस्ती दुनियादारी'मधील तिचा सहकलाकार सुजय म्हणजेच अभिनेता सुव्रत जोशी  झळकणार आहे. तसंच अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी या कलाकारांच्यादेखील सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले असून, 'ग्रहण' मालिकेद्वारे ती सध्या घराघरात पोहोचली आहे. नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्सने पार्टी सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

मैत्रीचा हॅंगओव्हर चढवणारी ही ‘पार्टी’ एन्जॉय करा, सिनेमागृहात येत्या 7 सप्टेंबरपासून.

Recommended

PeepingMoon Exclusive