तैमुरच्या जन्मानंतरही करिना कपूरची जादू अजिबात कमी न झाल्याचे दिसून येत आहे. बॉलिवूडमध्ये नेहमीच मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रींना हवे तसे सिनेमे आणि संधी मिळत नाही. याची प्रचिती नेहमीच आली आहे. पण इथे बेबो मात्र यासाठी अपवाद ठरणार आहे. तिच्या आई होण्यामुळे तिच्या स्टारडमला कुठेच धक्का लागलेला नाही.
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची बेगम असलेली करिना कपूर खान लग्नानंतर आणि मुलाच्या जन्मानंतरही आपल्या करिअरलाच प्राधान्य देताना नेहमी पाहायला मिळाली आहे. यंदा प्रदर्शित झालेला तिचा ‘वीरे दी वेडिंग या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कमाई केली. त्यानंर लगेचच एक-एक करत तिच्याकडे आता तीन सिनेमांची ऑफर आहे. तसंच नुकत्याच एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार ‘लाईफ इन मेट्रो’च्या सिक्वेलसाठीसध्दा तिचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमात तिच्यासोबत अर्जुन कपूर पुन्हा एकदा झळकणार असल्याचे समजते. अर्जुन आणि करिना यापूर्वी ‘कि अॅंड का’ मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले होते.
महत्त्वाचं म्हणजे एका प्रतिष्ठीत वृत्तपत्राच्या माहितीनुसार, करिनाने आपले भाव ‘वीरे दी वेडिंग’नंतर चांगलेच वाढवले आहेत. या सिनेमासाठी तिने 7 कोटी मानधन घेतले होते. आता आगामी प्रोजेक्ट्ससाठी तिने मानधनात वाढ करुन चक्क 10 कोटी इतके केले आहे. वा बेबो वा...आता स्टारडमचा पुरेपूर वापर कसा करून घ्यायचा, हे तुझ्याकडून इतरांनी शिकायला हवे.