By  
on  

Trailer Out: सायबर क्राईमवर भाष्य करतोय,‘टेक केअर गुड नाइट’

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेन्ट आणि एस पी एन्टरटेन्मेन्ट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’चा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे,आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे सिनेमातील गाण्यांना संगीत दिले आहे.

आज ऑनलाईनचे युग आहे. सर्व सुख आपल्या पायाशी एका क्लिकवर लोळण घेतात. पण या ऑनलाईन व्यवहारांचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही भरपूर आहेहेत. त्यामुळे आपल्याला हे व्यवहार करताना नेहमी जागरुक राहावे लागते, एका कुटूंबाने सायबर गुन्ह्याविरोधात उठवलेला आवाज आणि त्याच्या केलेला यशस्वी सामना याची ही कथा आहे. वडिलांचे आजच्या जगाशी जुळवून घेताना तंत्रज्ञानाशी हात मिळवणे तर मुलीचे तंत्रज्ञानामुळे कुटुंबाशी संवांद हरवून बसणे हे चित्र सिनेमात रेखाटण्यात आले आहे. ट्रेलर पाहून सिनेमाबाबतची उत्कंठा आणखी वाढली आहे.

https://www.facebook.com/EverestEntertainment/videos/219108822098218/

दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. गिरीश जोशी म्हणतात, “ या संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी  घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. “अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले. जगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडीट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटत राहिले,”.

गिरीश जोशी पुढे म्हणतात,"जरी हे माझ्या नातेवाईकच्या बाबतीत घडत असले तरी मी याबाबत मोठ्या प्रमाणावर लिहिले पाहिजे असे मनोमन ठरवून घेतले होते. जसजशा व्यक्तिरेखा आकार घेत गेल्या तसतसे ही सायबर क्राइमची समस्या किती गहन आहे, हे अधिकाधिक उलगडत गेले. ‘सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसामाणसांमधील तुटलेला संपर्क’ हे मध्यवर्ती सूत्र आकाराला आले. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जसजसे मी लिहित गेलो तसतसा माझ्यातील दिग्दर्शक अधिकाधिक आकार घेऊ लागला. त्यातून मग गती येत गेली आणि चित्रपटाला लय मिळत गेली. जेव्हा मी चित्रपटाचा अंतिम ड्राफ्ट तयार केला, तेव्हा मी ठरवले की या चित्रपटाचे दिग्दर्शनही मीच करणार. ‘टेक केअर गुड नाईट’ मग माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट ठरला.”

हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेला टेक केअर गुड नाईट हा सिनेमा येत्या 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित  होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive