By  
on  

पाहा: ही आहे सलमानची गर्लफ्रेंड; एन्जॉय करतोय माल्टा

 Wow.....बॉलिवूडचा दबंग खान सलमानची नवीन गर्लफ्रेंड आणि तिच्यासोबत तो माल्टा एन्जॉय करतोय.....कोण आहे, ती सुंदरी....बॉलिवूडमधली की कोणी परदेशी ललना......किती प्रश्न... सर्वांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.....ना! माहितीय.....तुमची उत्सुकता.....पण आम्ही तुम्हाला आता, सांगतोच...   बॉलिवूड भाई कुठल्याही मुलीला डेट करत नाहीय....तर तो चक्क आपल्या आईसोबत मनोसोक्त सुट्टी एन्जॉय करतोय.

सलमान खान नेहमीच आपल्या कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी असतो. कधी ‘दस का दम’चं शुटींग तर कधी ‘बिग बॉस’ आणि इतर वेळेस तर त्याचं सिनेमाचं शेड्यूलसुध्दा तितकंच पॅक असतं. पण यातसुध्दा नेहमी वेळात-वेळ काढून तो आपल्या कुटुंबाला प्राधान्य देताना पाहायला मिळतो. सलमानने ‘भारत’च्या शुटींगचा पहिला टप्पा मुंबईत पूर्ण केला असून पुढील शुटींगसाठी या सिनेमाची संपूर्ण टीम ‘माल्टा’ येथे पोहचली आहे. महत्त्वाचं म्हणजे, सलमान आपल्या संपूर्ण परिवारासह शुटींगसाठी येथे आला आहे.

https://www.instagram.com/p/BmX7VOxn-Qi/?taken-by=beingsalmankhan

सलमान खानने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो एकटा नसून त्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणजेच आपल्या लाडक्या आईसोबत म्हणजेच सलमा खान यांच्यासोबत हिंडताना दिसतोय. खुपच गोड आणि मस्त असा हा, व्हिडीओ असून सर्वांनाच तो प्रचंड आवडेल. सलमान आईचा हात पकडून मजेत फिरतोय. याचबरोबर सलमानने आईसोबतचा एक फोटोसुध्दा शेअर केला आहे. ज्यात त्याच्या आईने त्याच्या खाद्यांवर डोकं ठेवलं आहे. त्याने या फोटोला कॅप्शन दिलं आहे, ‘विथ लव्ह ऑफ माय लाईफ’.

सलमान आपल्या कुटुंबावर किती प्रेम करतो आहे, हे सर्वज्ञात आहे. संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवता यावा, म्हणून तो शुटींगला ‘माल्टा’ येथे त्यांना घेऊन गेलाय व प्रिय आईसोबत तो ‘माल्टा’ची छान सैर करतोय, शुटींगपण होतंय आणि कुटुंबाला वेळसुध्दा देता येतोय.वा भाईजान…वा... मान गए !

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive