By  
on  

‘बॉईज' पुन्हा येत आहेत, 'गोटी सोडा, बाटली फोडा' म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला

‘आम्ही लग्नाळू' म्हणत सर्वांना वेड लावणा-या बॉईज सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉईज 2 या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मिडीयावरुन लॉन्च करण्यात आलं.“वाढलाय वाढलाय.. खूप वाढलाय..'बॉईज'चा... 'कॉन्फिडन्स'! पुन्हा येत आहेत ताठ करायला.. युनिफॉर्मची 'कॉलर'... लवकरच!” अशा हटके कॅप्शन्ससह बॉईज 2 ची टीम सज्ज झाली आहे. तसंच सिनेमाच्या पोस्टरवरसुध्दा ‘गोटी सोडा, बाटली फोडा’, अशी मजेशीर टॅगलाईन देण्यात आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

https://www.facebook.com/BoyzMarathiFilm/videos/450211672156117/

पुन्हा नव्या जोमाने धुमाकूळ घालण्यासाठी ‘बॉईज 2’ येत्या 5 ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट एण्टरटेन्मेन्ट प्रस्तुत व अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत 'बॉईज 2 च्या  दिग्दर्शनाची धुरा पहिल्या भागाप्रमाणे विशाल देवरुखकर यांनीच सांभाळली आहे.

‘बॉईज 2’ सिनेमातील कलाकार अद्यापतरी गुलदस्त्यातच आहेत, परंतु सर्वांनाच याबाबतची प्रचंड आतुरता आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' या सिनेमाच्या निर्मात्याची भूमिका बजावली आहे.

आता बॉईजच्या सिक्वेलमध्ये कशाप्रकारची मस्ती आणि यारी दोस्तीसह धम्माल अनुभवायला मिळणार, पहिल्या भागाप्रमाणे खुमासदार संवाद असणार का, नायिका कोण असेल, याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive