By  
on  

‘हृदयात समथिंग समथिंग’मध्ये लव्हगुरूअशोक सराफ करणार प्रेमवीरांना मार्गदर्शन

अनोख्या प्रेमकथेवर ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा आगामी सिनेमा आधारित आहे. सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात मराठी सिनेसृष्टीत अनेक सिनेमांतून रोमँटिक भूमिका केलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची  या सिनेमातील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा उलगडली असून लव्हगुरू म्हणून ते प्रेमवीरांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे फुल ऑन धम्माल सिनमातून एन्जॉय करता येणार एवढं मात्रं, नक्की!

अशोक सराफ ह्यांच्या भूमिकेविषयी चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणतात, “अशोक सराफ ह्यांची ओळख कॉमेडीचा बादशाह आहे. जवळजवळ तीन दशक आपण मराठी सिनेमांतून त्यांचा रोमँसही पाहत आलोय. अशावेळी कॉमेडी आणि रोमँस दोन्हीचे गुरू असलेल्या अशोक सराफ ह्यांना ह्या मॅड कॉमेडी सिनेमातून ‘लव्हगुरू’च्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं आम्हांला वाटते.”

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण राजा कारळे म्हणतात, “ अशोकमामा त्यांच्या कॉमिक टाइमिंगसाठी ओळखले जातात. ह्या धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपटाव्दारे लव्हगुरू झालेल्या अशोकमामांकडून टिप्स ऐकायला मिळणं खूप मनोरंजक असेल.”

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटात अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियंका यादव, भूषण कडू आणि अशोक सराफ ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive