श्रीदेवी..दाक्षिणात्य अभिनेत्री ते बॉलिवूड सुपरस्टार. अनेक सुपरहिट सिनेमांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला. ‘ज्युली’ सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल. ‘हिंमतवाला’, ‘घरसंसार’, ‘कर्मा’, ‘लम्हे’, ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’, ‘सदमा’,’चालबाज’, ‘जुदाई’, ‘रुप की रानी चोरो का राजा’, ‘इंग्लिश विंग्लीश’ अशा त्यांच्या सुपरहिट सिनेमांची यादी न संपणारी आहे. ‘मॉम’ हा त्यांच्या कारकिर्दीतला अखेरचा सिनेमा ठरला.
सिनेसृष्टीतल्या अमूल्य योगदानाबद्दल श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही अजरामर आहेत. अभिनय आणि नृत्याविष्काराने सर्वांची मनं जिंकण्यात त्या नेहमीच यशस्वी ठरल्या.
सिनेसृष्टीतल्या अभिनयाचा श्रीगणेशा श्रीदेवी यांनी एक बालकलाकार म्हणून केला.
दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवून त्या बॉलिवूड गाजवायला सज्ज झाल्या. सुपरस्टार रजनिकांतसमवेत सिनेमातील एका दृश्यात श्रीदेवी.
सदमा सिनेमातील श्रीदेवींच्या भूमिकेला तोड नाही. 20 वर्षीय आणि आपलं पूर्वीचं जीवन विस्मरणात गेलेल्या मुलीची निरागस भूमिका साकारून ती अजरामर केली.
90 च्या दशकातील मि.इंडिया या सुपरहिट सिनेमातील सीमा या तरूणीची बोल्ड आणि ब्युटिफूल अशी ग्लॅमरस व्यक्तिरेखा साकारून सर्वांचच लक्ष वेधून घेतल.
इंग्लिश-विंग्लीश सिनेमाद्वारे श्रीदेवी यांनी आपल्या सेकंड इनिंगची दमदार सुरूवात केली. त्यांनी साकारलेली साधी-सरळ मराठमोळी गृहिणी शशी गोडबोले आजही सर्वांच्या लक्षात आहे.
24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबई येथे चांदनीने बॉलिवूडसह तमाम चाहत्यांचा अखेरचा निरोप घेतला.