By  
on  

पाहा : दोस्तांच्या 'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉंच

'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात! भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेले हे सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच बंदिस्त होतात. अशा या सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा 'पार्टी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित या 'पार्टी'चा नुकताच ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. धम्माल पार्टी मूडने उपस्थितांना खुश करून टाकणाऱ्या या सोहळ्यातत, 'पार्टी' सिनेमाच्या संपूर्ण टीमने उपस्थिती लावली होती.

https://www.youtube.com/watch?v=8Qa0mojxb_A&authuser=0

मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱ्या या ‘पार्टी’च्या ट्रेलरमध्ये सुव्रत जोशी,अक्षय टंकसाळे,स्तवन शिंदे,रोहित हळदीकर या चार मित्रांची धम्माल-मस्ती आणि सोबतच लव्हस्टोरी आपणास पाहायला मिळते. पण त्यासोबतच कालांतराने विभक्त झालेल्या या चौकडीचे दुख: यात दिसून येते. तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या नायिका म्हणून खुलून दिसतायत. शिवाय या ट्रेलरमधील 'घराचा व गाडीचा हफ्ता भरताना मैत्रीचादेखील हफ्ता भरायचा असतो, हे विसरून जातो आपण' हा हद्यस्पर्शी संवाद काळजाचा ठाव घेणारा ठरतो.

आपल्या आयुष्यात आणि संसारात मग्न झाल्यानंतर मागे राहून गेलेल्या जुन्या मित्रांची आठवण 'पार्टी' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना करून देतो. धम्माल विनोदाची परिपूर्ण मेजवानी देणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर पाहताना, 'पार्टी' हा सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे, याचा अंदाज येतो. हासू आणि आसू आणणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी परिपूर्ण असं मनोरंजानाचं पॅकेज घेऊन येत आहे. नवविधा प्रोडक्शन निर्मित आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांची प्रस्तुती असलेला हा ‘पार्टी’ सिनेमा, महाराष्ट्रातील तमाम मित्रांचे नाते आणखीन दृढ करण्यासाठी येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive