By  
on  

CONFIRMED:सुरू झालीय दिपीका-रणवीरची लगीनघाई; या दिवशी आहे लग्न

मागील काही दिवसांपासून बॉलिवूडचं हॉट कपल रणवीर सिंग आणि दिपीका पदुकोण यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. दोघांच्याही चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता आहे. ते दोघेही नेमके कधी विवाहबंघधनात अडकणार याबाबत सर्वत्र उलट-सुलट चर्चा रंगलीय. परंतु पिपींगमून डॉट कॉमच्या हाती या दोघांच्या लग्नाची तारीख हाती लागली आहे.

पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 20 नोव्हेंबरला दिपीका आणि रणवीर लग्न करणार आहेत. इटलीमध्ये हा शानदार विवाहसोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. ज्यात फक्त खास 30 नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा समावेश असेल, तर मुंबईत ग्रॅंण्ड रिसेप्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या खास पाहुण्यांमध्ये रणवीरचा खास मित्र अभिनेता अर्जुन कपूर आणि दिपीकाचा मित्र शाहरूख खान यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच रणवीर-दिपीका या बॉलिवूड लव्ह-बर्ड्सना फ्लोरिडा येथे सिक्रेट व्हेकेशन साजरे करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. रणवीर सिंह सध्या ‘सिम्बा’ सिनेमाची शुटींग पूर्ण करण्याची तयारी करतोय. त्याने नुकतंच नवीन घर खरेदी केलं असून त्याच्या घराच्या सजावटीचं काम सुरु आहे. लग्नानंतर दिपीका आणि रणवीर येथेच राहणार असल्याची चर्चा आहे. दिपीकाकडे सध्या तरी कुठलेही प्रोजेक्ट नसल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूडसोबतच रणवीर-दिपीका चाहत्यांनासुध्दा त्यांच्या बॅंड-बाजची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive