बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतच्या बहुचर्चित 'मणकर्णिका' या सिनेमाचा फर्स्ट लूक आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरवर कंगना एका शूर वीरांगनेसारखी घोडेस्वारी करताना पाहायला मिळतेय. 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत आहे. 1857 च्या उठावात झाशीच्या राणीने दिलेलं योगदान या सिनेमातून अनुभवता येणार आहे.
https://twitter.com/ZeeStudios_/status/1029569523974922241
झी स्टुडिओजने 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' या ऐतिहासिकपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून पोस्टरवरुनच कंगनाचे झाशीच्या राणीच्या व्यक्तिरेखेतील महत्त्वकांक्षा दिसून येत आहे. बॉलिवूडसह सर्वांनाच आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात कंगनासह तात्या टोपेंच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी, सदाशिव म्हणून सोनू सूद तर अभिनेत्री अंकिता लोखंडे झलकारी बाई या महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अंकिता या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेसाठी कंगनाने खास मेहनत घेतली आहे. तिने यासाठी तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. तसेच ती या सिनेमात घोडेस्वारीसोबतच अनेक स्टंट लिलया करताना पाहायला मिळणार आहे. एकूणच तिचं एक वेगळं आणि जुलमी ब्रिटीश राजवटीविरूध्दचं रौद्र रूप या सिनेमाद्वारे पाहणं फारचं औत्सुक्याचं ठरणार आहे.
'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 प्रदर्शित होणार आहे.