By  
on  

पाहा 'बिग बॉस मराठी 2' साठी महेश मांजरेकरांचा 'रॅपचीक' अंदाज

'बिग बॉस मराठी २' ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या नव्या सीजन मध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी असणार आहेत, याबाबत सर्वांना कुतूहल असणार आहे. अशातच या सीजनचं सूत्रसंचालन करणाऱ्या महेश मांजरेकरांचा एक हटके लुक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. हा लुक प्रसिद्ध होताच या लूकची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

महेश मांजरेकर हे या लूकमध्ये एक रॅपर दिसत असून त्यांनी 'बिग बॉस मराठी' २' साठी एक रॅप सॉंग गायलं असल्याची माहिती मिळत आहे. डोळ्यांवर गॉगल, जॅकेट, आणि हातात भोंगा असलेले महेश मांजरेकर विंटेज बीटल रेट्रो या गाडीवर बसलेले पाहायला मिळत आहेत. महेश मांजरेकरांचा हा 'रॅपचीक' अंदाज सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

https://www.instagram.com/p/BxW3vHXAIOl/

सूत्रांच्या माहितीनुसार, या रॅप सॉंगसाठी सहा वेगळ्या प्रकारचे सेट तयार करण्यात आले होते. 'बिग बॉस मराठी २' चा पहिला भाग २६ मे रोजी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. सर्वांच्या मनात या नव्या सीजनविषयी उत्सुकता लागून राहीली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive