By  
on  

'कोण होणार करोडपती'च्या सेटवर अभिनेते सयाजी शिंदेंची खास उपस्थिती

'कोण होणार करोडपती' हा नागराज मंजुळेचा सूत्रसंचालक म्हणून पहिलाच कार्यक्रम आहे. ह्यामुळे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या सेट्स वर एक खास पाहुणे आले होते. ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे. सयाजी शिंदे नुसतं सेट्सवर भेट द्यायला आले होते किंवा ते कार्यक्रमात सहभागी होणार आहेत? हे जाणून घेण्याची सर्वांना खुप उत्सुकता आहे.

सोनी मराठी आणि 'कोण होणार करोडपती'ने आधी सुद्धा असा उत्साह बऱ्याच वेळी निर्माण करून प्रेक्षकांना खूप वेगळे अनुभव दिले आहेत. येत्या २७ मेला प्रेक्षकांना सयाजी शिंदेनी नक्की या सेटला का भेट दिली या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. तर  पाहायला विसरु नका 'कोण होणार करोडपती' २७ मे पासून फक्त सोनी मराठीवर.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive