पुर्वीच्या काळात कलाकार दुखापत होऊ नये म्हणून बॉडी डबलचा पर्याय स्वीकारायचे. परंतु अलीकडे मात्र कलाकार बॉडी डबल न वापरता स्वतः अॅक्शन सिक्वेन्स करण्यास प्राधान्य देतात. हिंदीतील अनेक कलाकार आपल्या फिटनेसच्या जोरावर कठीण-कठीण स्टंट्स अगदी सहज करताना दिसतात. यामध्ये अक्षय कुमारचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. मराठीतही हा ट्रेंड हळूहळू रुळू लागला असून या यादीत अभिनेता अमोल कागणे आणि अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर नाव समाविष्ट झालंय. 'बाबो' या सिनेमात अभिनेता अमोल कागणे प्रेक्षकांसाठी एक कम्प्लिट सरप्राईझ पॅकेज म्हणून दिसणार आहे.
चित्रपटाच्या मागणी लक्षात घेऊन, अमोलने 'बाबो'साठी ७ किलो वजन घटवलं शिवाय अॅक्शन सिन्सही स्वतःच करण्याला प्राधान्य दिलं. सिनेमाच्या पटकथेनुसार, एका सीनमध्ये अमोल आणि प्रतीक्षाला तब्ब्ल ४ तास जमिनीपासून १६ फूट उंच असणाऱ्या झाडावर बसावं लागलं होतं. साधारण लांबलचक ४ पानी दीर्घ सीन्सचा चॅलेंज अमोल आणि प्रतीक्षाने केवळ घेतलाच नाही तर यशस्वीरीत्या सुद्धा केला. ५ तास झाडावर टेक-रिटेक देत, "एक अप्रतिम शॉट तर दिलाच पण आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवू शकलो. आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की आम्ही अनेक जुन्या आठवणी पुन्हा जागवल्या. शालेय जीवनातल्या गप्पांचा फड रंगला आणि त्यातच आम्ही इतका कठीण सीन कुठलेही बॉडी डबल्स न वापरता स्वतः केला'' असं अमोल कागणे म्हणाला.
https://twitter.com/babomovie/status/1120566790126546944