By  
on  

Birthday Special: कुशल नृत्यांगना ते उत्तम अभिनेत्री, असा आहे सोनालीचा प्रवास

सिनियर की ज्युनियर हा प्रश्न विचारून लोकांनी तीला सुरुवातीला खूप ट्रोल केलं. परंतु नंतर मात्र स्वतःच्या अभिनयाने तीने मराठी सिनेविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ती भरमसाठ सिनेमे करत नसली तरी मोजक्याच सिनेमांतून आपल्या अभिनयाची छाप पडते. अशी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. तीच्या वाढदिवसानिमित्त मराठी पीपीनंगमूनतर्फे या हरहुन्नरी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

[video width="480" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/05/peepingmoonmarathi_60717314_1139057349615986_7119971623943274496_n.mp4"][/video]

सोनालीचा जन्म १८ मे १९८८ साली पुण्यात झाला. 'हा खेळ संचिताचा' या मालिकेद्वारे सोनालीने अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनतर केदार शिंदे दिग्दर्शित 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमाद्वारे सोनालीने सिनेमाक्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच सिनेमातून तीने स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. या सिनेमातील भूमिकेसाठी तीला अनेक पुरस्कार मिळाले.

२०१० साली आलेल्या 'नटरंग' या सिनेमाने मात्र सोनालीची लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या सिनेमातील तीच्या भूमिकेचं आणि नृत्याचं सर्वच स्तरांकडून कौतुक झालं. त्यानंतर मात्र सोनालीने मागे वळून पाहिलं नाही. 'इरादा पक्का', 'क्षणभर विश्रांती', 'समुद्र', 'मितवा', 'पोश्टर गर्ल' यांसारखे वेगळे सिनेमे तिने केले.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'हंपी' आणि 'ती & ती' या सिनेमांतील तीच्या भूमिकांची सुद्धा सिनेवर्तुळात चर्चा रंगली होती. अभिनयासोबत सोनाली कथक नृत्य सुद्धा शिकली आहे. 'अप्सरा आली' या कार्यक्रमात ती परीक्षक म्हणून नुकतीच दिसली होती. यापुढेही सोनाली वेगवेगळे सिनेमे करत राहील, अशी तीच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive