By  
on  

महामानवाच्या गौरवगाथेत रमाबाई साकारणार ही अभिनेत्री

महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय राज्यघटनेत अतुल्य योगदान आहे. पन या सर्व प्रवासात अदृश्य पण अमीट असं रमाबाईंचंही योगदान आहे. बाबासाहेबांची जीवनगाथा रमाबाईंच्या उल्लेखाशिवाय अपुर्ण आहे. स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत रमाबाईंची व्यक्तिरेखा कोण साकारणार याची उत्सुकता आधीपासून होती. अभिनेत्री शिवानी रांगोळे या मालिकेत रमाबाईंची व्यक्तिरेखा साकारत आहे.

या व्यक्तिरेखेबाबत शिवानी म्हणते, ‘ही व्यक्तिररेखा माझ्यासाठी खरच आव्हानात्मक आहे. या भूमिकेसाठी मी अभ्यास करायला सुरु केला आहे. ही भूमिका यथायोग्य साकारण्यासाठी मी मनापासून मेहनत घेईन.’ अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय. बुद्धपौर्णिमेपासून ही मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive