By  
on  

अभिनेत्री स्मिता तांबे आता डिजिटल माध्यमात करणार पदार्पण

अनेक मराठी कलाकार सध्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर विविध माध्यमांमध्ये स्वतःला आजमावत आहेत. यातच स्मिता तांबे या अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे. स्मिता तांबे सध्या हिंदी आणि मराठी या दोन्ही माध्यमात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. स्मिताने '७२ मैल एक प्रवास', 'जोगवा', 'देऊळ' आदी मराठी सिनेमांत काम केले आहे. तसेच 'सिंघम रिटर्न्स', 'रुख' यांसारख्या हिंदी सिनेमात सुद्धा अभिनय केला आहे. मराठीमधील आगामी 'सावट' या सिनेमाच्या निर्मितीची धुरा स्मिताने सांभाळली आहे.

https://www.instagram.com/p/Bv_RyafpDd8/

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्मिता 'सेक्रेड गेम्स २' मध्ये सुद्धा झळकणार आहे. तसेच कंगना राणावतच्या आगामी 'पंगा' या सिनेमात सुद्धा स्मिता झळकणार आहे. तसेच 'हवा बदले हासू'च्या माध्यमातून स्मिता डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत आहे. पर्यावरण शास्त्रात पी.एच. डी करत असणाऱ्या आरती या मुलीची व्यक्तिरेखा ती साकारत आहे.

'हवा बदले हासू' ही पर्यावरणावर आधारित वैज्ञानिक थ्रिलर सिरीज आहे. सप्तराज सिवा यांनी या सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिक मुजुमदार यांनी हे वेबसिरीजची निर्मिती करत आहेत. शिवाय ते सहाय्यक लेखकाची जबाबदारी सुद्धा सांभाळत आहेत. लवकरच ही वेबसिरीज सोनी लिव्हवर सर्वांना पाहायला मिळणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive