By  
on  

Birthday Special: अभिनयासोबतच फॅशन विश्वात तेजस्विनी पंडित आहे लोकप्रिय

२००४ साली आलेल्या 'अगं बाई अरेच्चा' या मराठी सिनेमात नकारात्मक भूमिका साकारून तेजस्विनी पंडितने मराठी सिनेविश्वात स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. त्यानंतर तेजस्विनीने अनेक मराठी सिनेमांत तसेच मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या.

तेजस्विनीला अभिनयाचा वारसा आपल्या आईकडून मिळाला. तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर यांनी अनेक दशकं मराठी नाटक आणि सिनेमांतून अभिनय केला. आईच्या पावलांवर पाऊल ठेवत तेजस्विनीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'नाथा पुरे आता', 'गैर', 'टार्गेट', 'वावटळ', 'रानभूल', 'वैशाली कॉटेज', देवा, तू ही रे यांसारख्या सिनेमात तिने भूमिका साकारल्या. .

 

२०१० साली आलेल्या 'मी सिंधुताई सपकाळ' हा सिनेमा तेजस्विनीच्या अभिनय कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. या सिनेमामुळे तेजस्विनीच्या अभिनयाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. या सिनेमामुळे तेजस्विनीला अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले.

तसेच तेजस्विनीने नुकतंच '१०० डेज' या मालिकेत रहस्यप्रधान भूमिका साकारली. तीच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. २०१८ साली आलेल्या 'येरे येरे पैसा' या सिनेमातली तेजस्विनीची विनोदी भूमिका सुद्धा चांगलीच चर्चेत होती.

तेजस्विनीने अलीकडेच अभिनेत्री अभिज्ञा भावे सोबत 'तेजाज्ञा' हा फॅशन ब्रँड सुरु केला आहे. फॅशन विश्वात या मराठमोळ्या ब्रॅण्डची लोकप्रियता आहे. मराठी पिपिंगमूनतर्फे या चतुरस्त्र आणि सुंदर अभिनेत्रीला पुढील वाटचालीसाठी आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Recommended

PeepingMoon Exclusive