By  
on  

अभिनेत्री अभिज्ञा भावे करतेय मदतीचं आवाहन! कशासाठी ते जाणून घ्या

मराठी सिनेविश्वात वावरणारे कलाकार नेहमीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समाजकार्यात पुढाकार घेत असलेले पाहायला मिळतात. मालिकाविश्वातील गुणी अभिनेत्री अभिज्ञा भावेने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर एका व्हिडिओ मार्फत तिच्या चाहत्यांना एका मदतीचं आवाहन केले आहे.

अभिज्ञाला काही दिवसांपूर्वी रेवणसिद्ध नावाच्या एका व्यक्तीचा मॅसेज आला होता. रेवणसिद्ध हा घरात वाचनालय चालवत आहे. परंतु पुरेसे पैसे नसल्याने त्याला वाचनालयासाठी नवीन पुस्तक विकत घेता येत नाहीत. या उपक्रमाचं सगळे जण कौतुक करतात परंतु प्रत्यक्ष मदत करायला कोणी पुढे येत नाही. अशी खंत मॅसेजद्वारे रेवणसिद्धीने व्यक्त केली.

https://www.instagram.com/p/Bx1qhu4FQAV/

त्याच्या या मॅसेजची अभिज्ञाने गंभीर दखल घेतली.आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओमार्फत तिने चाहत्यांना या उपक्रमासाठी मदतीचं आवाहन केले आहे. शैक्षणिक किंवा इतर जी पुस्तक असतील ती या उपक्रमासाठी दान करण्याची विनंती अभिज्ञाने केली आहे.

रेवणसिद्ध शहाजी कदम हा 'पुस्तकांचे घर' हा उपक्रम चालवत असून त्याच्या या उपक्रमाला थोर समाजसेवक डॉ.प्रकाश बाबा आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांनी सुद्धा यापूर्वी सदिच्छा भेट दिली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive