By  
on  

'विठूमाउली' मालिकेच्या टीमने ५०० भागांचं दणक्यात केलं सेलिब्रेशन

‘स्टार प्रवाह’वरील ‘विठुमाऊली’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम आणि निर्माते महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या उपस्थितीत सर्वानी सेटवर केक कापून सेलिब्रेशन आलं. ‘विठुमाऊली’ मालिकेचा ५०० भागांचा हा रोमांचक प्रवास यापुढेही उत्कंठावर्धक होणार आहे.

‘विठुमाऊली’ मालिकेत सध्या विठुरायाच्या मंदिराच्या उभारणीचा नयनरम्य प्रवास पाहायला मिळतोय. विठ्ठलाचा लाडका भक्त पुंडलिकाने हे पवित्र काम हाती घेतलंय. पुंडलिकाच्या या प्रवासात बरेच अडथळेही आहेत. पुंडलिकाचं मंदिर उभारण्याचं हे कार्य पूर्ण होऊ नये म्हणून कलीचेही प्रयत्न सुरु आहेत. या अडथळ्यांवर मात करत पुंडलिक विठ्ठल  मंदिराची उभारणी कशी करणार? याचा रंजक प्रवास ‘विठुमाऊली’च्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

 या प्रवासात आजवर [पुंडलिकाला विठुरायाची साथ नेहमीच मिळाली आहे. यावेळेस तर विठ्ठलाने पुंडलिकाच्या सहाय्यासाठी १२ बलुतेदारांची रुपं घेतली आहेत. यात लोहार, चांभार, परीट, सुतार, कुंभार, गवळी, सोनार, महार, कोळी, न्हावी, जोशी आणि गुरव अशी दहा रुपं घेणार  आहेत.

विठुमाऊलीच्या आणखी दोन रुपांचं दर्शन मालिकेतून लवकरच घडणार आहे. १२ बलुतेदारांच्या विराट दर्शनानंतर विठुराया कलीचा नाश कसा करणार याची गोष्ट २७ मेच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. ‘विठुमाऊली’ ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.०० वाजता फक्त ‘स्टार प्रवाह’वर सुरु आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive