By  
on  

अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या आंतरराष्ट्रीय मालिकेचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अलीकडेच ती 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या वेबसिरीजमुळे श्रियाला खूप लोकप्रियता मिळाली. श्रिया आता आंतरराष्ट्रीय मालिकेत काम करणार असून 'बीचम हाऊस' असं या मालिकेचं नाव आहे.

गुरिंदर चढा यांची ही मालिका असून १९ व्या शतकातील आलिशान घर 'बीचम हाऊस' आणि त्या घराभोवती वावरणाऱ्या माणसांभोवती या मालिकेचं कथानक गुंफण्यात आले आहे. टॉम बेटमन, लेस्ले निकोल, मार्क वॉरेन, लिओ सुटेर आदी लोकप्रिय कलाकारांच्या या मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत.

https://www.instagram.com/p/Bx31TJ2FaGw/

एक रहस्यमयी भूतकाळ असणारी आणि जॉन बीचम यांच्या मुलाचा सांभाळ करणारी चंचल हे पात्र श्रिया साकारत आहे. या भूमिकेबाबत श्रिया म्हणाली,''चंचल या व्यक्तिरेखेला अनेक पदर आहेत. ती अनाकलनीय असून कुठेतरी प्रेमाच्या शोधात आहे.''

मराठी तसेच हिंदी सिनेविश्वात आणि ऑनलाईन विश्वात छाप पडणारी श्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या अभिनयाद्वारे कोणती कमाल करते, हे येत्या काही दिवसांमध्ये कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive