By  
on  

आपुलकीच्या नात्यात गुंफलेला 'मोगरा फुलला' सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठी सिनेविश्वात कौटुंबिक सिनेमे प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. 'मुंबई पुणे मुंबई ३', 'वेडींगचा शिनेमा' यांसारख्या कौटुंबिक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या यादीत 'मोगरा फुलला' या सिनेमाची भर पडली आहे. श्राबनी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलला' सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या टीजर मध्ये स्वप्नील जोशी एकदम वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. लग्न होत नसलेला तरी आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाच्या भूमिकेत स्वप्नील पाहायला मिळत आहे. तसेच नीना कुलकर्णी, संदीप पाठक, चंद्रकांत कुलकर्णी यांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमातून अभिनेत्री सई देवधर खूप वर्षांनी मराठी सिनेमात झळकणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=Xg1snqoeTwI&feature=youtu.be

श्राबनी देवधर दिग्दर्शित मोगरा फुलला या सिनेमाची पटकथा संवाद सचिन मोटे यांनी लिहिले आहेत. अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा बहारदार सिनेमा येत्या १४ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive