By  
on  

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये शिवानी सुर्वेच्या शूजमागचे हे आहेत डिझायनर

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये 'देवयानी' फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. तिचे स्टाइलिश आउटफिट, एक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे. शिवानीने या गोष्टी कोणत्या तरी महागड्या डिझायनरकडून विकत घेतले असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण शिवानीच्या या  शूज मागचे डिझायनर ऐकून तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसेल.

शिवानीचे शूज डिझाइनर असले तरी पण ते कोणत्याही महागड्या डिझाइनरने डिझाइन केलेले नसून, ते दिव्यांग मुलांनी डिझाइन केलेले आहेत. 'फिट मी अप' एनजीओच्या मुलांनी डिझाइन केलेले हे शूज शिवानी सध्या घालत आहे. शिवानी दिव्यांग मुलांसाठी असलेल्या ‘आय केअर लर्निंग स्कुल’ काम करते. या संस्थेचा ‘फिट मी अप’ हा दिव्यांग मुलांना रोजगार मिळवण्यासाठी सुरू झालेला एक उपक्रम आहे.

'फिट मी अप'शी निगडीत प्रसन्नती अरोरा सांगतात की, “मी आणि माझी मैत्रिण दिपशिखाने 2011ला दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ची सुरूवात केली. त्यांना सज्ञान झाल्यावर रोजगार मिळावा हा या मागचा उद्देश आहे. आणि आम्हांला आनंद आहे की, शिवानी सुर्वेसारखे सेलिब्रिटीज आमच्या या उपक्रमाला अशा पध्दतीने पाठिंबा देत आहेत.”

बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर शिवानी सुर्वे यासंदर्भात सांगताना म्हणाली, “जरी ही मुलं दिव्यांग असली तरीही कोणत्याही पारंगत डिझाइनर प्रमाणे त्यांनी शूज डिझाइन केले आहेत. त्यामुळे मी त्यांनी डिझाइन केलेले तीन-चार शूज घेऊन बिगबॉसमध्ये चाललीय. त्यांच्यासाठी माझ्या परीने उचललेला हा खारीचाच वाटा म्हणा ना.”

शिवानी सध्या ‘बिग बॉस मराठी 2’च्या स्वतःच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी घरच्यांचा आठवणीने शिवानी व्याकुळ झाली. तिने काही क्षण नेहा शितोळेंला मिठी मारून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

https://www.instagram.com/p/Bx_25YYAp-W/

पहिल्या सिजनप्रमाणे बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या सिजनलासुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याची दिसून येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive